Motivational Marathi quotes, Marathi Suvichar, Inspirational Marathi quotes, Marathi Charoli, Marathi poem
Thursday, 22 March 2018
आजचा तरुण व त्यापुढील आव्हाने
मनाशी थोडं हितगुज.
**असच मनाशी थोडस हितगुज**
आज घरातून बाहेर पडल्यानंतर कामाच्या सर्व वस्तू सोबत आहेत की नाही हे चेक केलं....मोबाईल, यूएसबी, वालेट, पेन ...सर्व सोबत आहे...समजल्याने बरं वाटलं..
पण नंतर महत्वाचा विषय डोक्यात आला...आणि स्वतःहा प्रश्न विचारला मनाला...मनुभाऊ आपण सोबत तर आहात ना आमच्या? आतून उत्तर आले....काळजी नसावी भावा मी तुझ्यासोबतच आहे...उत्तर ऐकून हायसं वाटलं☺ आणि आनंद झाला😊.
मनुभाऊंचे खूप खूप आभार☺😊 ...वयाच्या 24 शी पर्यंत आमच्या सोबत राहिलात , पुढेही न चुकता नेहमी आमच्या सोबत राहाल.. म्हणून मंडळ आपलं आभारी आहे.😊😊
मुद्दा हा आहे कि मनाला नेहमी सोबतच ठेवायला हवं ते जेव्हा भटकत तेव्हा मात्र गडबड होते आणि जरी ते भटकलं तरी त्याला ताळ्यावर आणण्याची कला आपण शिकून घ्यायला हवी.
काय हे ना....इथं जे ते स्वतःमध्ये व्यस्त झालंय.... त्यामुळे स्वतःच स्वतःला सावरता यायला हवं... , स्वतःचा शोध घेता यायला हवा , नवीन नवीन गोष्टी शिकून घेता यायला हव्यात , मनाला नेहमी सजग ठेवता यायला हवं आणि स्वतःचा मार्गदर्शक होता यायला हवं....नई का!
©मयुर पन्हाळे.
आवडलं ☺ तर आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या आणि लाईक व फॉलो करा.
mayurpanhale.blogspot.com
Monday, 19 March 2018
तू अशीच आहेस
**☺ तू अशीच आहेस☺**
तू पण कशी आहेस ना...
आली आहेस ...
पण दिसत नाहीयेस.
बघत आहेस ...
पण बोलत नाहीयेस.
विचार करत आहेस...
पण व्यक्त होत नाहीयेस.
व्यस्त आहेस...
तरीही भावुक होत आहेस.
आनंदी आहेस...
तरीही आनंदापासून वंचित आहेस.
सोबत सर्व आहेत...
तरीही वाट बघत आहेस.
पूर्ण आहेस ...
तरीही अपूर्ण आहेस.
जीव तर आहे..
पण जिवंत मात्र नाहीयेस.
तू एक स्वप्न...
तू एक स्वप्नातली आठवण.....मयु
#Reality_Marathi_quotes_on_life_#Marathi_suvichar_#Marathi_charoli_#Relationship_Marathi_quotes_#Love_quotes_in_Marathi_#Heart_touching_love_quotes_in_Marathi
एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून न घेता, त्या व्यक्तीविषयी जजमेंट करणं म्हणजे, अंधारात तीर मारल्यासारखं आहे. #पोरखेळ!
-
आपल्या आयुष्यात आजपर्यंत जे घडलंय, त्याला महत्व आहे पण, एक क्षणही आयुष्याला कलाटणी देण्यासाठी पुरेसा आहे! आपण जागे आहात ना? संधी आपल्य...
-
एखाद्या गोष्टीसाठी आपण थांबलो असेल तर ती गोष्ट मिळवुनच , पुढच्या प्रवासाला निघालं पाहिजे। ...कारण व्यर्थ वेळ दवडायला आपल्याला एवढा वे...