Wednesday, 30 May 2018

Tuesday, 22 May 2018

**तनहाईयोंकी गर्दीश**

इतना भी तनहां मत रहा करो....
के तनहाईयोंके गर्दीशमें आप....
अपना वजूद ही भूल जाओ.
                               -मयु

धकाधकीचं आयुष्य.

धकाधकीचं आणि धक्यांचं आयुष्य आहे...
स्वतःला नाहीसं केलं कि
मगच थोडसं हलकं हलकं वाटतं.
                                       -मयु

Tuesday, 17 April 2018

मी आणि माझं

मी आणि माझं ....
याच्या पलीकडं पण जग आहे.
डोळे उघडण्याची वेळ झाली आहे...मयु

Friday, 6 April 2018

व्यक्ती , वस्तू आणि जीव

**आजचा विचार**
व्यक्ती असो किंवा वस्तू ...
प्रमाणापेक्षा जास्त कोणाला
जीव लावल्यास त्रासच होतो...भाऊ..
                                  मयु

Tuesday, 3 April 2018

विचार.. झोप..आणि जाग.

कुठलाच विचार तुम्हांला जागं करू शकत नाही....
जोपर्यंत तुम्ही झोपलेले आहात....भाऊ

Thursday, 29 March 2018

मृत्यू

मृत्यू शाश्वत सत्यआहे....
तरीही लोकं त्याला घाबरतात ओ.
मयु

Tuesday, 27 March 2018

प्रवास

तुम्ही थकलात तरी चालेल....
तरीही दररोज थोडा का होईना
पण प्रवास कराच!
प्रवास....मनाचा
कारण प्रवास तुम्हांला परत
एक नवी स्फूर्ती देईल😊

Monday, 26 March 2018

निळ्याशार आभाळाला

** निळ्याशार आभाळाला **

निळ्याशार आभाळाला प्रश्न विचारण्यासाठी
आज मन आभाळाकडे बघत आहे...
अनंत गुपिते , असंख्य छटांचे हे आभाळ
आज मनाला खूप काही सांगत आहे.
जसे मनात असंख्य विचार असतात...
तशाच आभाळाच्याही आहे असंख्य भावछटा.
मनातली प्रत्येक भावना काहीतरी सांगून जाते...
तसेच आकाशातली प्रत्येक छटाही काहीतरी सांगत असते.
स्वरूप तिचे असाधारण आहे...
ना आदि ना अंत आहे.
जसे अस्तित्व आहे...चिरंतन , तेजस्वी आत्म्याचे.
प्रश्न आज पडला आहे अस्तित्वाचा ...
अनंत असे ब्रह्मांड हे...
आपलं अस्तित्व नेमकं काय?
चार घटकांचे आयुष्य हे...
असेच निघून जाणार असेल...तर
थोडे थांबावे म्हणतो...
स्वतःशी विचार करावा म्हणतो.
थोडेसे जगून बघावे म्हणतो...
थोडे स्वतःसाठी , थोडे कुटुंबासाठी ,
थोडे समाजासाठी  , थोडे राष्ट्रासाठी ..
आणि थोडे जगून बघावे म्हणतो...
काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी.
आयुष्य जरी एकच असले...
तरी पैलू मात्र अनेक आहेत.
प्रत्येक पैलूत आयुष्य आहे.
प्रत्येक पैलूत चैतन्य आहे.
समज थोडासा सर्वांना मिळावा...
याचीच मन वाट बघत आहे.
निळ्याशार आभाळाला प्रश्न विचारण्यासाठी ...
आज मन आतुर झाले आहे.
अनंत गुपिते , असंख्य छटांचे हे आभाळ ...
आज मनाला खूप काही सांगत आहे.
                                         ©मयुर पन्हाळे
                       mayurpanhale.blogspot.com

Sunday, 25 March 2018

व्यक्ती आणि आयुष्याचा खेळ

आयुष्याचा खेळ...
काही व्यक्तींना विसरायचे नसते....
आणि काही व्यक्ती विसरू देणार नसतात.

Saturday, 24 March 2018

मनःस्थिती

मनःस्थिती..
कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या
भेटीची ओढ असते...
तर कधी कधी
कुणीच भेटु नये असे वाटते।

विचार आणि सकाळ

विचार शुभ असतील तर सकाळ नक्कीच शुभ राहणार।
शुभ सकाळ☺

Thursday, 22 March 2018

आजचा तरुण व त्यापुढील आव्हाने



** आजचा तरुण व त्यापुढील आव्हाने **
‘तारुण्य’ म्हणजे ऊर्जा , तारुण्य म्हणजे इच्छा-अपेक्षा , आशा –आकांक्षा , आनंद-उल्हास , नवीन शिकण्याची , नवीन आत्मसात करण्याची उमेद , तारुण्य म्हणजे विचार ...जो माणसाला नेहमी कार्यप्रवण ठेवतो, उत्साही ठेवतो . ‘तरूण’ आणि ‘तारुण्य’ यात फरक आहे .
     आजचा तरुण ‘तरुण’ तर आहे , मात्र त्यात तारुण्याचा अभाव दिसून येत आहे. नाविन्याचा , उर्जेचा , विधायक  कार्य करण्याच्या इच्छाशक्तीचा , उत्साहाचा अभाव दिसून येत आहे . आजचा तरुण चंचल तर आहे  मात्र स्वाभिमानाऐवजी त्यात गर्व आणि अहंकार दिसून येत आहे. कर्तुत्व तर शून्य आहे मात्र अहंकार काठोकाठ भरला आहे. आजच्या तरुणात ऊर्जा तर आहे मात्र त्या उर्जेला दिशा नाही तिचा उचित कार्यासाठी उपयोग होत नाही त्यामुळे तर सर्व दशा आहे. दुसर्‍यावर विसंबून राहण्याची , परावलंबित्वाची मानसिकता आजच्या तरुणात वाढत चालली आहे . उद्यावर व नशिबावर आजचा तरुण विसंबून रहात आहे . प्रत्येक गोष्टीत आळस आणि आयतेपणा हा वाढत चाललेला आहे . कष्ट करण्याची तयारी कमी होत चालली आहे. व्यसन तसेच सोशल मिडीयाच्या आधीन गेल्यामुळे मानसिक अस्वस्थता , अशांतता , आकर्षण , शारीरिक शिथिलता , एकाग्रतेचा अभाव , एका दिवसात श्रीमंत , प्रसिध्द  होण्याची अपेक्षा अशा एक ना अनेक गोष्टी आजच्या तरुणात वाढत चाललेल्या आहे. आज गरज आहे तरुणांनी जागे होण्याची . ज्या राष्ट्राचे तरुण झोपेत आहेत त्या राष्ट्राचा सर्वनाश हा आपोआप होत असतो . त्यामुळे तरुणांनी वेळीच सावध होण्याची वेळ आली आहे. अनावश्यकपेक्षा आपल्यासाठी काय आवश्यक आहे हे ओळखणे महत्वाचे आहे. जसे आपले ‘इनपुट’ असेल तसेच ‘आउटपुट’ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे योग्य ‘इनपुट’ देण्याची वेळ आता आली आहे . एक वाक्य तरुणांनी नेहमी लक्षात असू द्यायला हवं. तुम्ही वर्तमानात काय करता यावर तुमचा भविष्यकाळ हा अवलंबून आहे . त्यामुळे आपल्याला आपला भविष्यकाळ हा चांगला व्हावा असे वाटत असल्यास आपण वर्तमानात काय करायला हवे हे सांगण्याची आवश्यकता नाही.
     अनेक आव्हाने तुमची वाट बघत आहे आणि प्रत्येक आव्हानाला आपल्याला मनगटात कधीही न संपणार सामर्थ्य घेवून सामोर जायचं आहे . संघर्षातून शक्ती मिळवून प्रत्येक आव्हानावर मात करायची आहे . आव्हान मग ते वैयक्तिक , कौटुंबिक , सामाजिक , जागतिक , मानसिक ...या प्रत्येक आव्हानावर आपल्याला विजय मिळवायचा आहे . त्यासाठी आळस सोडावा लागेल ...जागे व्हावे लागेल ...उर्जेने स्वत:ला भारावून घ्यावं लागेल ....कर्म करावे लागतील ...स्वत:ला झोकून द्यावं लागेल . किर्तीचे, यशाचे अत्युच्च शिखरे तुमची वाट बघत आहे ...तेव्हा जागे व्हा ..ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरु करा ..सातत्य ठेवा .
   ‘माणूस’  हा सवयीचा गुलाम आहे . सवयच माणसाला घडवत –बिघडवत असते . त्यामुळे चांगल्या सवयी आपल्या अंगवळणी पडायला हव्यात ...सकाळी लवकर उठणे , व्यायाम , योगासने , सुर्यनमस्कार हे सर्व व्यायाम शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि ध्यान , योग या गोष्टी मानसिक स्वास्थ्यासाठी करायला पाहिजेत जेणेकरून भौतिक गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडणार नाही. ...वाईटाचे चिंतन खूप लवकर केले जाते त्यामुळे अशा गोष्टींपासून स्वत:ला अलिप्त ठेवणे ..मनानं सजग राहणे ...मनातला वॉचमन जागृत ठेवणे ...आपले ध्येय सदैव डोळ्यासमोर ठेवणे , त्याप्रती समर्पित असणे या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत.
   ‘व्यसन’ हे वाईट आहे. तरीही ते केले जाते. कुठलेही व्यसन करतांना आपल्याला आपल्यासाठी कष्ट करणारे आपल्यावर ज्यांचा विश्वास आहे असे आपले आई-वडील आठवायला हवे , आपल्यासाठी स्वप्न बघणारे ..आपल्या आई-वडिलांचे डोळे आपल्याला आठवायला हवे. व्यसन करण्यामागेही शास्रीय कारण असते...त्यात क्षणिक आनंद मिळतो म्हणून ...मग अतीव , उत्कट, ....कधीही  न संपणारे आनंदाचे अनेक स्रोत आहे . तिकडे मनाला वळवायला हवे. अनेक छंद , खेळ  , निसर्ग , प्रवास,  वाचन , लेखन , गायन  अनेक गोष्टी आहेत ...त्याकडे मनाला घेवून जायला हवं.
     ‘अति तिथे माती’ ही म्हण नेहमी लक्षात असू द्यायला हवी. त्यामुळे सोशलमिडीयाचा अतिरेक आपण स्वत:हुनच टाळला पाहिजे . प्रत्येक गोष्टीचा समतोल साधता यायला हवा. ‘आउटपुट’ काय मिळतंय याला महत्त्व आहे त्यावरून ‘इनपुट’ किती द्यायचं हे ठरवायचं असत. रममाण होण्यासाठी अनेक विश्व आहेत . त्यामुळे फक्त कृत्रिम , काल्पनिक , आभासी विश्वातच का रममाण व्हायचं ? हा पण एक प्रश्न आहे.
    आयुष्य जगत असतांना ताणतणावाकडेही लक्ष देणं व त्याचे नियोजन करणे हे महत्वाचे आहे. ताणले तर तुटते हे आपण जाणतोच त्यामुळे प्रत्येक गोष्टीत लवचिकता असायला हवी. फक्त स्वार्थाकडे न बघता नातेसंबंध जोपासायला हवीत , माणसं जपायला , कमवायला हवीत. फक्त स्वार्थाकडे न बघता काही कामे निस्वार्थ , उदात्त  भावनेनीही करायला हवीत. आपल्या कौटुंबिक सामाजिक जबाबदारीचं भान ठेवायला हवं. राष्ट्रहित , राष्ट्रीयत्व याविषयी आपल्या भूमिका आपण वठवायला हव्यात .
   उज्वल भविष्यकाळ हा आपली वाट बघत आहे त्यासाठी वर्तमानात चांगले कार्य करा, सकारात्मक रहा, स्वत:वर विश्वास असुद्या व प्रामाणिकपणे आपले ध्येय गाठा. उज्वल भविष्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा.
तुमचाच.
मयूर पन्हाळे.  
mayurpanhale.blogspot.com  
©मयूर पन्हाळे
*लेख आवडला तर नक्की शेअर करा आणि ब्लॉगला भेट देवून लाईक व फॉलो करायला विसरू नका.
धन्यवाद.

मनाशी थोडं हितगुज.

   **असच मनाशी थोडस हितगुज**
    आज घरातून बाहेर पडल्यानंतर कामाच्या सर्व वस्तू सोबत आहेत की नाही हे चेक केलं....मोबाईल, यूएसबी, वालेट, पेन ...सर्व सोबत आहे...समजल्याने बरं वाटलं..
    पण नंतर महत्वाचा विषय डोक्यात आला...आणि स्वतःहा प्रश्न विचारला मनाला...मनुभाऊ आपण सोबत तर आहात ना आमच्या? आतून उत्तर आले....काळजी नसावी भावा मी तुझ्यासोबतच आहे...उत्तर ऐकून हायसं वाटलं☺ आणि आनंद झाला😊.
     मनुभाऊंचे खूप खूप आभार☺😊 ...वयाच्या 24 शी पर्यंत आमच्या सोबत राहिलात , पुढेही न चुकता नेहमी आमच्या सोबत राहाल.. म्हणून मंडळ आपलं आभारी आहे.😊😊
    मुद्दा हा आहे कि मनाला नेहमी सोबतच ठेवायला हवं ते जेव्हा भटकत तेव्हा मात्र गडबड होते आणि जरी ते भटकलं तरी त्याला ताळ्यावर आणण्याची कला आपण शिकून घ्यायला हवी.
     काय हे ना....इथं जे ते स्वतःमध्ये व्यस्त झालंय.... त्यामुळे स्वतःच स्वतःला सावरता यायला हवं... , स्वतःचा शोध घेता यायला हवा , नवीन नवीन गोष्टी शिकून घेता यायला हव्यात , मनाला नेहमी सजग ठेवता यायला हवं आणि स्वतःचा मार्गदर्शक होता यायला हवं....नई का!
©मयुर पन्हाळे.

आवडलं ☺ तर आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या आणि लाईक व फॉलो करा.
mayurpanhale.blogspot.com

विषयांशी आसक्ती

विषयांशी आसक्ती वाढल्यानंतर....
माणसाची स्व: विषयीची जाणीव ....
मृत्यूशय्येवर येते.
                      -मयु

Monday, 19 March 2018

तू अशीच आहेस

**☺ तू अशीच आहेस☺**

तू पण कशी आहेस ना...
आली आहेस ...
पण दिसत नाहीयेस.
बघत आहेस ...
पण बोलत नाहीयेस.
विचार करत आहेस...
पण व्यक्त होत नाहीयेस.
व्यस्त आहेस...
तरीही भावुक होत आहेस.
आनंदी आहेस...
तरीही आनंदापासून वंचित आहेस.
सोबत सर्व आहेत...
तरीही वाट बघत आहेस.
पूर्ण आहेस ...
तरीही अपूर्ण आहेस.
जीव तर आहे..
पण जिवंत मात्र नाहीयेस.
तू एक स्वप्न...
तू एक स्वप्नातली आठवण.....मयु

चेहरे आणि मुखवटे

असे अनेक चेहरे भेटतील आयुष्यात...
जे बोलतील एक...
मनात ठेवतील दुसरच..
आणि करतील तिसरच..
चेहऱ्यांचा आता वीट आलाय....
चेहरेही नकोत आणि चेहऱ्याआड असणारे मुखवटे तर नकोच.

एक आठवण

तू आहेस ....
तरी पण तू नाहीस...
एक आठवण....मयु

आयुष्याच नाटक

मला नाटक जमत नाही...
नाहीतर खूप छान करून दाखवलं असत.
मयु

Sunday, 4 March 2018

तू आणि मी

तू स्वतःला तू म्हणून संबोधायला 
आणि स्विकारायला सुरुवात करायला हवी .
मग तुला 'मी' ची बाधा होणार नाही.
टिप- हे स्वतःचे स्वतःला सांगणे आहे.
mayurpanhale.blogspot.com

Saturday, 3 March 2018

काही उणीवा भरून काढता येणार असतात।
पण काही आयुष्यभर सोबत राहणार असतात।

Monday, 19 February 2018

मनातलं सर्वकाही

मनातलं सर्व काही
त्याच व्यक्तीसमोर व्यक्त होणार असत।
जिच्यासाठी उरात
सर्वकाही साठवलेलं असत।

Tuesday, 30 January 2018

असंच अनुभवलं म्हणून....

असंच अनुभवलं म्हणून.....
एक विचार आठवणीत ठेवायच्या नादात 
दुसरा हवेत विरून गेला।
आयुष्यात पण असंच घडत असतं 
मन मानत नसलं तरी काहीतरी सोडावं लागतं 
आणि मनात नसलं तरी काहीतरी सोबत घेऊन जगावं लागतं।
काहीतरी सुटल्यानंतर , काहीतरी मिळाल्याचा आनंदही गौणच ठरतो।
घडामोडी, अनुभव, प्रत्यय, रुक्षता, व्यथितता, हिरमोड,आनंद, उल्हास, समर्पण, सेवा, भक्ती , श्रद्धा, निर्वाण, शून्य, स्थिरता , उद्विग्नता आणि व्यक्तता, जिंकणं आणि हरणं।
यालाच तर एकंदरीत आयुष्य म्हणायचं असतं।mayurpanhale.blogspot.com

Thursday, 25 January 2018

नाते आणि औपचारिकता

जेथे केवळ औपचारिकता असते।
तेथे नाते टिकू शकत नाही।
mayurpanhale.blogsot.com

Wednesday, 24 January 2018

Tuesday, 23 January 2018

काळोखी रात्र

काळोख्या रात्रीचही आज 
मनाला काहीतरी सांगणं आहे।
निद्रिस्त मनाचा दरवाजा 
आज ती थोठावत आहे।
तिने तिचा मार्ग सुकर केला
प्रकाशाचा मार्ग पुढे केला।
डोक्यात विचारांचा अग्नी पेटवून
अग्निज्वाला मात्र शांत झाल्या।
mayurpanhale.blogspot.com

Monday, 22 January 2018

आयुष्य आणि खेळ।

क्रिकेट, हॉलीबॉल खूप खेळलो।
आता थोडं आयुष्याशी खेळून बघावं म्हणतोय।
mayurpanhale.blogspot.com
मी माणूस म्हणून आदर करतो।
स्वतःचाही आणि दुसऱ्याचाही।
एक माणूस।

Sunday, 21 January 2018

शरीर आणि मन

शरीर आजारी पडल्यावर 
त्याला औषधाची गरज असते।
आणि मन आजारी पडल्यावर 
त्याला चांगल्या विचारांची।
mayurpanhale.blogspot.com

प्रवास

एखाद्या गोष्टीसाठी आपण थांबलो असेल
तर ती गोष्ट मिळवुनच ,
पुढच्या प्रवासाला निघालं पाहिजे।
 ...कारण व्यर्थ वेळ दवडायला 
आपल्याला एवढा वेळ नाही।
mayurpanhale.blogspot.com

नुसतंच थांबणं...आणि मनानं थांबणं

नुसतंच थांबणं ....आणि 
मनानं थांबणं यात फरक आहे।
कारण नुसतंच थांबलोय हे कळत नसतं...आणि मनानं थांबलोय हे कळत असुनही कळतं नसतं।
mayurpanhale.blogspot.com

Monday, 1 January 2018

अंतरंग

**अंतरंग**
अंतरंगात कधी बघता येत नसत।
पण अंतरंग अनुभवता येवु शकत।

बदललेलं कलियुग

**बदललेलं कलियुग**

आकर्षणाला बहार फुटत आहे, 
सात्विकतेचा सूर्य अस्ताला जात आहे।
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
जपायला नाही राहिले पावित्र्य 
नाही राहिली नीतिमत्ता आणि सुशीलता
सर्व काही खेळ आहे काळाचा ....
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
मुलगा आणि मुलगी इथे नाही विचारत आईबापाला।
बायको म्हणते नवऱ्याला गावाकडेच राहुद्या सासू सासऱ्याला।
खटका उडल्यावर नवरा बायकोत, 
त्रास होतो भांड्यांच्या जीवाला ....
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
मी पणाचा येथे दंभ आहे,
यत्किंचित कारणांचा क्रोध आहे।
सर्व काय ते मलाच असा हव्यास आहे.....
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
वाद झाल्यावर येणारा घुर्रा आहे,
कामामुळे पडणारं नेट आहे।
उडवाउडवीचा सर्वत्र खेळ आहे...
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
एकनिष्ठतेचा लोप झालेला आहे,
मर्यादांच उल्लंघन झालेलं आहे।
सत्यवचनाचा अभाव आहे......
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
गती आयुष्याची येथे वाढलेली आहे,
का पाळतोय याच उत्तरही नाहीये।
सर्व उडालेला गोंधळ आहे....
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
उत्तरोत्तर वाढत जाणारा ताणतणाव आहे,
हृदयाची वाढत जाणारी धडधड आहे।
विकारांचे चिटकलेले जाळे आहे....
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
क्षणाक्षणाला होणारं राजकारण आहे,
भरीस भर म्हणून होणाऱ्या काड्या आहेत।
तुटपुंज्या स्वार्थासाठी परस्वाधीनता आहे ....
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
उच्चनीचतेची अजूनही आही आहे,
डोळ्यांमध्ये जाणवणारा भामटेपणा आहे।
कुणाचं चांगलं झालं तरी वाटणारा हेवा आहे....
बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
एकाला हाय तर दुसऱ्याला बाय आहे,
तिसऱ्यासोबत कॉफी तर चवथ्यासोबत जेवण आहे।
सर्व फिरवाफिरवीचे जाळे आहे।
भाऊ बदललेल्या कालियुगाची हीच खरी परिभाषा आहे।
mayurpanhale.blogspot.com

#Reality_Marathi_quotes_on_life_#Marathi_suvichar_#Marathi_charoli_#Relationship_Marathi_quotes_#Love_quotes_in_Marathi_#Heart_touching_love_quotes_in_Marathi

एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून न घेता, त्या व्यक्तीविषयी जजमेंट करणं म्हणजे, अंधारात तीर मारल्यासारखं आहे. #पोरखेळ!